तुळजापूर (प्रतिनिधी) - आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज पडणार नाही या निर्णयाचे सकल मराठा समाजाकडुन स्वागत होत आहे. या निर्णयाचा फायदा कुणाला तोटा कुणाला होणार हे निवडणुक नंतर स्पष्ट होणार आहे.

मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुक लढवायची का नाही या बाबतीत प्रत्येक गावात जावुन मराठा समाज बांधवांची बैठक घेऊन अहवाल सादर करा. नंतर लोकसभा निवडणुक लढायाचे की नाही कुणाला सोबत घेऊन लढायाचे या बाबतीत निर्णय  घेणार असल्याचे सांगितले होते. माञ वेळे अभावी गावागावात प्रत्येक मराठ्यांपर्यत पोहचणे शक्य नसल्याचे दिसुन आल्याने अखेर शनिवारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत  मराठा लोकसभा निवडणुकीत पडणार नाही असे स्पष्ट करून ज्याला पाडायाचे असेल त्याला पाडा असा संदेश दिला.

 या निर्णयामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसरी आघाडी मराठा, दलित, मुस्लीम बांधवांना घेवुन बांधणार होते त्याला खीळ बसणार आहे.

मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयाने सुशिक्षित मराठा बांधवातुन स्वागत केले जात  आहे. माञ या निवडणुकीतुन काही लाभ घेण्यासाठी मराठा समाजाची शिडी वापरण्याचे ठरवलेल्या मंडळीची पंचायत झाली आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकिय जाणकार व्यक्त करीत आहेत.


मराठा समाज हिताचा निर्णय 

मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी समाज हिताचा निर्णय घेतला असुन या निर्णयामुळे मराठा समाज अजुन एकसंघ होणार आहे.

कुमार टोले

सकल मराठा समाज समन्वयक


 
Top