धाराशिव (प्रतिनिधी)-  भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय अस्मिता लिग ॲथलेटिक्स स्पर्धा 24 नोव्हेंबर 2025 रोजी  श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 14 व 16 वर्षांखालील मुलींच्या या दोन वयोगटातील स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील 262 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचे उद्घाटन निकिता पवार तालुका प्रशिक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी व राजेश भवाळ, महेश पाटील ॲथलेटिक्स राज्य क्रीडा मार्गदर्शक व संजय कोथळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी,धाराशिव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव योगेश थोरबोले, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, क्रीडा मार्गदर्शक डिंपल ठाकरे,विश्वास खंदारे, क्रीडा प्रशिक्षक राजेश बिलकुले,सुरेंद्र वाले, राहुल जाधव, कुलदीप सावंत आदी उपस्थित होते. भारतातील 300 जिल्ह्यांमधून ही अस्मिता लिग ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून गुणवंत खेळाडूंची निवड करणे हा प्रमुख उद्देश आहे. या गुणवत्ता शोध अस्मिता ॲथलेटिक्स स्पर्धेतून धाराशिव जिल्ह्यातील मुलींना एक माध्यम तयार होईल, असे महेश पाटील यांनी सांगितले. भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याकडून आलेले तज्ञ मार्गदर्शक  वैभव पायगुडे, ज्ञानेश्वर धमकुंडलवाड यांनी या स्पर्धेतून गुणवत्ताधारक खेळाडूंची चाचणी घेऊन त्यांची पुढील स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी निवड करणार आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद देताना, आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अतिशय चांगली कामगिरी स्पर्धेदरम्यान नोंदवली. प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. अशा प्रकारची स्पर्धा दरवर्षी भारतातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार असून यातून गुणवंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेचे पंच म्हणून ज्ञानेश्वर भुतेकर, रोहित सुरवसे, ऋषिकेश काळे, योगिनी साळुंखे, प्रणिता जाधवर, संतोष चव्हाण, कृष्णा राठोड, सुरेश कोकाटे, ओमप्रकाश ढगे, विभुते काम पाहिले.


स्पर्धेचा अंतिम निकाल

14 वर्षाखालील मुली- (अनुक्रमे प्रथम 3 क्रमांक) ट्रायथलॉन अ आरती धनंजय मोरे (इंदापूर), आर्या महेश वाकुरे (धाराशिव), अमृता औदुंबर तोर (आळनी), ट्रायथलॉन बी पलक अस्लम मेंडके (धाराशिव), समृद्धी अमर नन्नवरे(तुळजापूर),श्रद्धा राठोड (जळकोट), ट्रायथलॉन सी वैष्णवी विजय वावरे, राधा महेश रणदिवे (धाराशिव), उपासना जयप्रकाश चौधरी (तुळजापूर).

16 वर्षाखालील मुली- 60 मी धावणे आकांक्षा लहू गपाट (इंदापूर), श्रीदेवी परशुराम राठोड(जळकोट),ऋतुजा प्रकाश मांडवे (उमरगा), 600 मीटर धावणे अनुजा बाळासाहेब गोरे, आकांक्षा लहू गपाट,ऋतुजा प्रकाश मांडवे, लांब उडी शेख गुलनूर कबीर,उर्मिला संजय चव्हाण, उंच उडी सई निलेश महामुनी, अल्फिया हसन मुल्ला, गोळा फेक दीक्षा बोने,गायत्री लोंढे, प्राची भारत गवळी, थाळी फेक ऐश्वर्या नागेश पवार,प्राची भारत गवळी,अक्षरा उमेश घोगरे, भालाफेक भूमिका परमेश्वर मेनसे, सई निलेश महामुनी.


 
Top