तुळजापूर (प्रतिनिधी)-  नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच तुळजापूर शहरात विजेचा लपंडाव पुन्हा एकदा सुरु झाला आहे. दररोजची अनियमित वीजपुरवठ्याची समस्या शहरवासीयांसह तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना मोठ्या अडचणीत टाकत आहे.

तीर्थक्षेत्र तुळजापूरात येणाऱ्या भाविकांसाठी वीजपुरवठा खंडित होणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. मंदिर परिसर, निवासस्थाने, रस्ते आणि बाजारपेठेत अचानक जाणारी वीज व पर्यायाने बंद पडणारे दिवे, पंपिंग, सीसीटीव्ही यामुळे भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. भाविकांचे म्हणणे आहे कि“देवीच्या दर्शनासाठी आलो विद्युत पुरवठा बंद होत असल्याने सुविधा बंद पडतात. सुविधा बंद पडतात यामुळे आमच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. याला जबाबदार कोण असा सवाल करीत आहेत.

शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून असा आरोप होत आहे की, मुख्य वीज अधिकाऱ्यांची उपस्थिती शहरात नसल्यामुळे समस्येकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. अधिकारी सतत अप-डाउन करत असल्यामुळे स्थानिक समस्या प्रत्यक्ष पाहण्याकडे दुर्लक्ष होते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळेच “सदर अधिकाऱ्यांनी काही काळ तुळजापूरमध्येच निवास अनिवार्य करावा” अशी मागणीही जोर धरू लागली आहे. तुळजापूरमधील विद्युत यंत्रणा अनेक वर्षांपासून निकृष्ट दर्जाची असल्याचे आरोप शहरवासीयांकडून वारंवार केले जात आहेत. 


चौकशीची मागणी

शहरवासीय व स्थानिक सामाजिक संघटनांकडून मागणी केली जात आहे की, तुळजापूरच्या संपूर्ण वीज व्यवस्थेची स्वतंत्र चौकशी करावी. दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. तत्काळ दर्जेदार विद्युत यंत्रणा उभी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक संघटनांकडून होत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आता राजकीयदृष्ट्या बनण्याची शक्यता निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांचे एकच म्हणणे“निवडणुकी आधी वीजपुरवठा सुरळीत करा अशी मागणी होते आहे.

 
Top