धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते महिला पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी  जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड व महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या धाराशिव शहराध्यक्षपदी स्वाती रणजीत डोंगरे तसेच रा.काँ.धाराशिव महिला शहर उपाध्यक्षपदी हसीना रियाज पटेल, रा.काँ.धाराशिव महिला  शहर सचिव पदी लैला फरीद शेख, रा.काँ.धाराशिव महिला  शहर सहसचिव पदी सुलताना युसुफ शेख यांची  नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

आपल्यावर जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या जबाबदारीचे व संधीचे नक्कीच सोने करून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचे नेतृत्व अधिक बळकट करू असा विश्वास नवनियुक्त महिला पदाधिकारी यांनी व्यक्त केला.

या पक्षप्रवेशावेळी पक्ष कार्यालयात माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, धाराशिव महिला शहर अध्यक्ष सुलोचना जाधव, धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष रुक्मिणी कुंभार,धाराशिव महिला अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमिना शेख, धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे, सा.न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात  काजी, केशेगाव जि.प गटप्रमुख लिंबराज लोखंडे,बिस्मिल्ला शेख,मदिना शेख, जरीना मुलानी,रशिदा शेख, अंजुम शेख, फर्जना शहा, सायरा शेख,सुरेखा चव्हाण,सहकारी  सहकारी उपस्थित होते.


 
Top