भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील मात्रेवाडी येथील इयत्ता दहावी मध्ये न्यू हायस्कूल जांब येथे शिकत असलेली पण मात्रेवाडी वरुन कधी चालत तर कधी एस.टी.ने  ये जा करणारी वडिलांचे छत्र हरवलेल्या जान्हवी मुकुंद तमांचे हिची माहिती लोकसेवा हायस्कूल गिरवलीचे सहशिक्षक संदीप बागडे यांना मिळाली. लगेचच बागडे यांनी जान्हवीस मात्रेवाडी वरून ये-जा करण्यासाठी सायकल भेट दिली. 

तसेच तिला शालेय गणवेश, इयत्ता दहावीचा पुस्तकांचा संच, कंपास, वह्या व रजिस्टर भेट देण्यात आले. यावेळी तिच्या दोन लहान बहिणींना कपडे वह्यांची मदत करण्यात आली. यावेळी वारे सायकल मार्टचे शिवाजी वारे उपस्थित होते. जान्हवीच्या पुढील शैक्षणिक शिक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन कपडा बँकेचे संदीप बागडे यांनी केले आहे. आतापर्यंत कपडा बँकेच्या माध्यमातून भूम, गिरवली भागात 14 सायकल वाटप करण्यात आल्या असून, याकामी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ टकले यांनी हि आर्थिक सहाय्य केले आहे.


 
Top