धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही संघटना शिक्षकांच्या प्रश्न संदर्भात शाळा स्तरापासून मंत्रालयीन स्तरापर्यंत अनेक प्रश्न निकाली काढण्यामध्ये अग्रेसर आहे.
दिनांक 24 मार्च रोजी ठाणे येथे संघटनेच्या पुढील वाटचाली संदर्भात राज्यस्तरीय पदाधिकारी व जिल्ह्यातील असंख्य शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सदरील बैठकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक विभाग जिल्हाध्यक्ष म्हणून श्री विशाल जाधव सर, जिल्हा कार्यवाह म्हणून श्री सतीश जाधवर, राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, जिल्हा सल्लागार सुहास दराडे यांना संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यवाह भरत मडके व सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सदर सदरील निवडीबद्दल जिल्हाभरातून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.