धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आणि  परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ वाचाळ पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेस जोडे मारुन प्रतिकात्मक दहन करण्यात आले. धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे सेनेच्या वतीने मंगळवारी (दि.12) हे आंदोलन करण्यात आले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या आंदोलनात माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, विजय सस्ते,तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमानी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, बंडू आदरकर, राजाभाऊ पवार,बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे,पंकज पाटील, तुषार निंबाळकर, गणेश खोचरे, नितीन शेरखाने,राणा बनसोडे, सुरेश गवळी, पांडू भोसले, गणेश असलेकर,अफरोज पिरजादे, मुजीब काझी, नाना घाटगे, दिनेश बंडगर, नवज्योत शिंगाडे, रवी कोरे,गफूर शेख,अमोल मुळे,विश्वजीत सारडे,शिवप्रताप कोळी,सौदागर जगताप,सतीश लोंढे,अभिजीत देशमुख,अमित उंबरे,राकेश सूर्यवंशी,सुधीर अलकुंटे,सत्यजित पडवळ,पिंटू आंबेकर,संकेत सूर्यवंशी, गणेश साळुंके, महेश मगर, जगदीश शिंदे, संदीप शिंदे, सह्याद्री राजेनिंबाळकर, अशोक जाधव, गणेश राजेनिंबाळकर, चेतन वाटवडे, पोपट खरात, सुधीर जाधव, महेश लिमये, राजपाल पाटील, रोहन मचाले, राकेश कचरे, शरीफ शेख, आकाश मुंगळे, साबेर सय्यद यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top