भूम (प्रतिनिधी)-वीरशैव लिंगायत समाजाच्या उत्कर्षासाठी मला खासदारकी दिली आहे. लिंगायत समाजाची महाराष्ट्र मध्ये फार दुरावस्था झाले आहे. समाजातील वंचित घटकांची सेवा घडावी यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या 423 व्या समाधी सोहळ्यानिमित्त भूम तालुक्यातील श्री क्षेत्र मन्मथ स्वामी देवस्थान शिवखडा येथे बोलताना सांगितले. 

पुढे बोलताना म्हणाले की वीरशैव लिंगायत समाजातील सर्व जातींना ओबीसी संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी मदत करणार आहे. लिंगायत समाजातील सर्व पोट जातींना एकत्र करून वंचितांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील मठ मंदिरे जे दुर्लक्षित झाले आहेत. त्या मंदिरांना निधी देऊन जीर्णोद्धार करणार असल्याचे यावेळी म्हटले. लिंगायत समाजातील सर्व पोट जातींना ओबीसी प्रमाणपत्र काढताना लिंगायत शब्द असल्यामुळे ओबीसी प्रमाणपत्र मिळत नाहीत याच्यासाठीही मी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. मला पक्षाने सांगितलय समाजाला संघटित कर एकत्र कर समाजाच्या समस्या जाणून घे समाजासाठी काम करा म्हणून मी माझ्या पत्नीसह सर्वत्र फिरून समाजासाठी काम करणार आहे. मी इथं माझ्या समाजातल्या मुलींच्या शिक्षणासाठी आलो आहे. समाजातील तरुणा ंची बेरोजगारी वाढवण्यासाठी आलो आहे. समाजातील जातीपातीच्या भिंती काढून टाका समाजाच्या विकासासाठी एकत्र या असे आवाहन यावेळी खासदार गोपछडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी 108 श्री गुरुगिरी शिवाचार्य मानुरकर महाराज, श्री राचलिंग शिवाचार्य परडकर महाराज, बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर, संजय गाढवे, रेवणसिद्ध लामतुरे, नितीन चेडे, प्रवीण शेटे, सतीश कवडे, त्रिंबक स्वामी, शिवापा तळेकर, सिद्धेश्वर मनगिरे, दीपक खराडे, शिवशंकर खोले, मधुकर शेटे, बाळासाहेब गवळी, अमेय पाटील यांच्यासह तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजातील समाजबांधव भगिनी उपस्थित होत्या.


 
Top