भूम (प्रतिनिधी)- भूम-माणकेश्वर बार्शी मार्गे पुणे स्वारगेट ही नवीन बससेवा चालू करण्यासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने 17 मे 2023 रोजी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने सतत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत आगार व्यवस्थापक दीपक लांडगे यांनी मागणी मंजूर करून घेतली. तसेच दिनांक 13 मार्च पासून सकाळी 7 वा.30 मि. बस सुरू करत असल्याचे स्वराज्य संघटनेच्या पदाधिकारी यांना कळवले. 

स्वराज्य संघटनेच्या वतीने बस सेवा सुरू करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आगार व्यवस्थापक यांचा सन्मान करण्यात आल. नवीन भूम ते बार्शीमार्गे जेजुरी ही बससेवा सुरू करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. नवीन बस सेवेचा लाभ हा रात्री 8 वाजता बार्शी वरून भूम प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. यावेळी स्वराज्य संघटनेचे विलास पवार, निलेश वीर, गणेश अंधारे, आशिष अंधारे, अभिषेक करळे उपस्थित होते.


 
Top