तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात अत्यल्प पर्जन्यवृष्टीमुळे पाणीसाठे रसातळाला गेले असुन जिथे मानवाला पाणी  मिळणे कठीण बनले आहे. मुक्या पाखंराचे काय होल होत असणार असे असताना सैनिक विद्यालयाचा आवारात माञ शिक्षकांच्या पुढाकाराने चिमणी पाखरांची तृष्णा भागविण्यासाठी झाडाला पाणी भरलेले टब बांधण्यात आले. त्यातील पाण्याने कडक उन्हाळ्यात पाखरांची तृष्णा भागणार आहे. त्यामुळे येथे उन्हाळ्यात  पाखरांचे वास्तव होवुन  किलबिलाट ऐकावयास मिळणार आहे.

येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक चिमणी दिनानिमित्त सर्व पाखरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. शाळेच्या हिरव्या गर्द वनराईने नटलेल्या परिसरात, कडक अशा उन्हाळ्यात चिमण्या पाखरांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून प्रति वर्षाप्रमाणे विद्यालयातील हिंदी शिक्षक देविदास पांचाळ यांनी प्लास्टिकचे छोटे छोटे टब विद्यालयास भेट दिले. विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयातील विद्यार्थी या सर्वांच्या हस्ते चिमण्यांना पिण्यासाठी पाण्याचे छोटे छोटे टब झाडांना बांधण्यात आले. 


पशुपक्षी प्राण्यांना संकटात मदत करा संदेश देणारा उपक्रम 

पशुपक्षी प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे व वेळोवेळी त्यांना मदत केली पाहिजे हाच मोलाचा संदेश या उपक्रमातून मिळतो.


पाच वर्षापासुन पाखरांना पाणपोई उपक्रम 

उन्हाळ्यात पाखरांची तृष्णा भागविण्यासाठी  मागील पाच वर्षा पासुन आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. सैनिक शाळा समोर घनदाट वनराई निर्माण केली असून, येथील झाडांना तीस टब लटकावले आहेत. एकूण खर्च 1200 रूपये आला आहे. अशी माहीती प्राचार्य वैजीनाथ घोडके यांनी दिली.


 
Top