तुळजापूर (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाचे जेष्ट नेते तथा माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बारामती जावुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष  तथा माजी केंद्रीय मंञी शरदचंद्र पवार यांची  भेट गुरुवार दि. 21 मार्च रोजी दुपारी 4 ते 4.30 वाजता भेट घेवून अशी अर्धा तास चर्चा केली. यावेळी शरद पवार यांच्यात धाराशिव जिल्हातील राजकिय परिस्थिती सह अन्य विषयावर चर्चा झाली. माञ  काय व कोणत्या विषयावर चर्चा झाली हे बाहेर कळू शकले नाही.

या वेळी शरद पवार, माजी मंञी मधुकर चव्हाण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्यात तासभर चर्चा झाली.  माञ यात काय चर्चा झाली याची माहीती बाहेर येवू शकले नाही.यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सतिश राऊत ,स्वीय सहाय्यक शरद पवार तसेच माजी मंत्री  मधुकर चव्हान यांचे स्वीय सहाय्यक बबन जाधव उपस्थित होते. सध्या तुळजापूर तालुक्यात माजी मंञी मधुकर चव्हान यांच्या परिवार बद्दल अनेक चर्चा होत असल्याने या भेटीने या चर्चला पुर्ण विराम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 
Top