धाराशिव (प्रतिनिधी)-येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागाच्या वतीने मुलींसाठी खास महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 यावेळी घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन विभाग प्रमुख  डॉ.प्रशांत कोल्हे  ,प्रा एन व्ही भोसले ,प्रा व्ही सी  मैंदर्गी ,प्रा व्ही एस बोनदर यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थिनींनी नाटक, गाणे व कवितेच्या माध्यमातून महिला दिनाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना महाविद्यालयाचर प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने म्हणाले की , स्त्री सक्षम असून ती खंबीरपणे उभी आहे. परंतु तिला आजही व्यासपीठ जर उपलब्ध झाले तर तिच्यामध्ये असलेल्या कलागुणांना नक्कीच वाव मिळतो .महिला दिनानिमित्त अशा अनेक महाविद्यालयीन मुलींनी खूप सुंदर आपल्या मधील कला गुण दाखविलेले आहेत. याचा अभिमान आणि कौतुक वाटतं.  यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोल्हे म्हणाले की, आता मुली कुठेच कमी नसून त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. त्यांनी अशीच प्रगती करत राहावी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रा. एस. जि. शिंदे, प्रा. डी. व्ही. हराळकर, प्रा. व्ही. ए. डावरे, व्ही. डी. पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे महिला दिनानिमित्त मुलींनी सर्व शिपाई महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान केला. प्रा.वर्षा बोंदर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.


 
Top