भूम (प्रतिनिधी)-जय हनुमान समाज विकास संस्था,पुणे यांच्या रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम  स्कूलचे 6 वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कांबळे याच्या पत्नी उषाताई कांबळे, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम नरसिंग भंडे यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन,सरस्वती पूजन करण्यात आले.

व्यासपीठावर स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजर योगेश टोंगारे, कृषी अधिकारी रवींद्र घुले,शाखा अभियंता गिराम, तालुका कृषी अधिकारी गुडूप आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत शिक्षक म्हणून शिक्षकांचा देखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे असे मान्यवरांनी सुचवले. श्री गणेशा गाण्याने कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळी विध्यार्थीनी हिंदी मराठी चित्रपटात व लोकगीतावर अति सुदंर असे नृत्य सादर केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत चा प्रवास नाटकांमधून बालपणाकरांनी दाखवून दिला. शेतकरी गीत,फनी डान्स ,लेझी डान्स अशा वेगवेगळ्या नृत्यानी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे शाळेतील सर्व शिक्षकांनी दिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कोळेकर आणि प्रकाश आकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व  शिक्षकवृंदानी अतिशय परिश्रम घेतले.यावेळी प्रशासकीय अधिकारी हरिष धायगुडे, प्राचार्य शीतल बावकर,भाग्य जैन हे उपस्थित होते.


 
Top