भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय भूम प्राणीशास्त्र विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर. बोधगया व  भारतीय विज्ञान मंडळ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने चर्चासत्र आयोजित केले होते या चर्चासत्राचा शुभारंभ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम यांच्या हस्ते झाला. 

या चर्चासत्र परिषदेचे उद्घाटन  डॉ. जी. डी. खेडकर छत्रपती संभाजी नगर यांनी केले. या प्रसंगी विद्या विकास मंडळ सचिव काटे, सहसचिव एस. एस. शिंदे, उत्तमराव बोराडे, प्रा. टी. आर. बोराडे उपस्थित होते. यावेळी डॉ. मिलिंद शिरभाते यांनी जैवविविधतेचे महत्त्व पटवून दिले. डॉ. बी. एल. चव्हाण यांनी जैवविविधता कायदा या विषयाची गांभीर्य पटवून दिले. त्यानंतर डॉ. सोमनाथ वाघमारे यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. नंतर पहिल्या दिवसाचा समारोप कार्यक्रम झाला. ऑनलाइन राष्ट्रीय चर्चा सत्रात  पी नागराज राव कॅलिफोर्निया विद्यापीठ युएसए यांच्या मार्गदर्शनाने झाले. प्रा. करुणा परदेशी पुणे, डॉ. सुनिता बोर्डे, डॉ. सी. मंजुलता विशाखापटनम, डॉ. अनिल परदेशी, डॉ. अपर्णा कलवटे, डॉ. एच. एस. जगताप, डॉ. टी. आर. देशमुख, प्रा. टी. आर. बोराडे, डॉ. विक्रम खिल्लारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. बी. चंदनशिव उपस्थित होते. 

यावेळी या चर्चा सत्राला 96 शोध निबंध आले. तर 175 संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक हजर होते. तसेच सर्व प्राध्यापकानी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रा. दीप्ती गिरी व प्रा.जीएस खंदारे यांनी केले. तर आभार डॉ. नितिन पडवळ यांनी केले.



 
Top