धाराशिव (प्रतिनिधी)-केंद्रात नरेंद्र मोदी सरकारकडून प्रत्येक वेळी शेतकऱ्याची फसवणुक होत आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव 65 वरुन 15 वर आला, दुधाचे भाव गडगडले तसेच सोयाबीन 11,000/- वरुन 4500/- वर आले. तसेच कारखान्यावर इथेनॉल निर्मीतीसाठी बंधने घातले. यामुळे केंद्र सरकारवर शेतकऱ्यांचा तिव्र राग असून याला केंद्र सरकार जबाबदार आहे. यामुळे आम्ही भाजपमधून आम्ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करत असल्याची भावना भंडारवाडी येथील प्रवेश प्रसंगी या ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीच्या सदस्यांनी व्यक्त केली.

जिल्हयात आर.डी.एस.एच.च्या माध्यमातून 1303 कोटीचा आराखडा राज्य शासनाकडे दाखल असून वेळोवेळी मागणी करुन देखील शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे नविन सबस्टेशन फिडर नविन लाईन ओढणे अशी एक ना अनेक कामे अद्यापर्यंत सुरु झालेले नाही. यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना विज वेळेवर मिळत नाही व जी मिळते ती कमी दाबाने मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी असून देखील मुबलक प्रमाणात शेतीला पाणी वापरता येत नाही.

केंद्र सरकार खाजगी उद्योजकाच्या उदा. सिमेंट, स्टील तसेच शेतीसाठी लागणारे अवजारे बि-बियाने, खते यावर कुठलीही निर्बंध लावत नाहीत मात्र शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालावर महागाईचा बाऊ करुन निर्बंध लावते व त्याचा परीनाम शेतकऱ्याचा उत्पादनाचे भाव कमी होण्यावर होते. यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडत असून वाढत्या शेतकरी आत्महात्या शासनाची ही धोरणे कारणीभुत आहे. त्यामुळे आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने लोकसभेत भुमीका मांडली आहे. मात्र याबाबत केंद्र सरकार उदासीन असून शेतकऱ्याच्या कल्याणासाठी कुठलेही ठोस पाऊल न उचलता केंद्र सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला धडा शिकवावा असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भंडारवाडी येथे प्रवेश कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले

याप्रसंगी तालुकाप्रमुख सतीशजी सोमाणी, द्वारकानाथ नाना माळी, सरपंच सागर एडके, संगमेश्वर पाटील, दयानंद माळी, राजभाऊ देशमुख, रणधीर पाटील,विभागप्रमुख राजेंद्र तुपे, युवासेना उपतालुकाप्रमुख अविनाश इंगळे,हिज्जू भाई काझी आदी मान्यवर उपस्थित होते.

पक्षप्रवेश झालेले भाजपचे कार्यकर्ते राहुल बप्पा माळी उपसरपंच,गणेश शिनगारे वि का सोसायटी चेअरमन,ग्रा पं सदस्य धनंजय पाटील, संजय जाधव,वि का सोसायटी सदस्य धनराज भारती, महादेव धोंगडे, बाळासाहेब सलगर आदी उपस्थित होते.


 
Top