तुळजापूर (प्रतिनिधी)-तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे शुक्रवारी दि.8 मार्च रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास  छञपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आगमन झाल्यानंतर तो वाजतगाजत आंबेडकर चौकात आणुन प्रतिष्ठापीत केला.

आगामी निवडणुकांन पार्श्वभूमीवर  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  पुतळा उभारणी  श्रेय घेण्याच्या कारणावरुन महायुती व  महाविकास आघाडी  घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकते समोर समोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नगरपरिषद प्रशासनाने हा जाहीर कार्यक्रम नसुन प्रोटाकाँल प्रमाणे अनावरण सोहळा कार्यक्रम केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. पक्षाच्या पदाधिकारी ने सामजांस्याची भूमिका घेतल्याने तणाव निवळला. नंतर पुतळा चबुतऱ्यावर बसविण्यात आला. यावेळी पुतळ्याचे पुजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विनोद गंगणे, सचिन रोचकरी, धिरज पाटील, रुषीकेश मगर, नगरपरिषद अभियंता प्रशांत चव्हाण, दत्ता सांळुके, मिलींद रोकडे, तानाजी कदम, औदुंबर कदम, जीवन कदम, संगिताताई कदम  सह सर्व पक्षाचे पदाधिकारी व आंबेडकर विचाराचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


 
Top