तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे मानेवाडी येथील सरपंच नेहरू बंडगर यांनी मासिक बैठक न घेतल्याने जिल्हाधिकारी यांनी दि 07 मार्च 2024 रोजी निकाल देत केले सरपंच पदावरून पायउतार.

मौजे मानेवाडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये झाली व जनतेतुनच नेहरू दशरथ बंडगर हे सरपंच म्हणून निवडून आले.पण नियमानुसार मासिक बैठक न घेतल्याने मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या कडे मौजे मानेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य बिरू धोंडीबा माने व इतर सदस्याने सरपंच हे प्रत्येक महिन्याला मासिक बैठक घेत नसल्याबाबत व कर्तव्यात कसूर व कामात अनिमित्त व अकार्यक्षमता दिसून येत असल्याने  जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 36 नुसार तक्रार  दाखल केला होता. या प्रकरणाची गट विकास अधिकारी तुळजापूर यांना चौकशी आदेश दिल्यावर विस्तार अधिकारी कळसाईत यांच्यामार्फत चौकशी केले असता चार मासिक बैठका घेतल्या नसल्याचे व अनियमित्ता  दिसून आली. असा अहवाल विस्ताराधिकारी कळसाईत यांनी चौकशी अहवालामध्ये स्पष्ट नमूद केला आहे. गटविकास अधिकारी यांनी  जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 36 अन्वये प्रत्येक महिन्याला मासिक बैठक घेणे  बंधनकारक आहे. या तरतुदीनुसार सरपंचाने कसूर केली असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. ते दोषी आढळून आल्याचे सिद्ध झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी सरपंच नेहरू दशरथ बंडगर यांना सरपंच म्हणून चालू राहण्यास किंवा पंचायतीच्या सदस्याच्या पदाच्या उरलेल्या कालावधीसाठी सरपंच म्हणून निवडला जाण्यास अपात्र करण्यात येते असा निकाल दिला आहे.


 
Top