भूम (प्रतिनिधी)-भाजपच्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीत मोदी, शहा यांची नावे आहेत. मात्र भाजपसाठी कष्ट घेणाऱ्या नितीन गडकरी यांचे या यादीत नाव नाही.  प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळाल्याची लाभार्थ्यांची खोटी आकडेवारी देतात. असा आरोपही ठाकरेंनी केला. निवडणुकीच्या तोंडावर गॅस सिलिंडरचे दर कमी करता व निवडणूक झाली कि वाढवता. ही नाटके बघून देश कंटाळलाय. शेतकऱ्यांचा पुळका दाखवितात आणि शेतकऱ्यांना हमी भाव देत नाहीत. मी मुख्यमंत्री असताना नागपूर अधिवेशनात कोणाची मागणी नसताना 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते. मला शेतीतले काही कळत नाही. मात्र शेतकऱ्याच्या डोळ्यातील आश्रू दिसतात असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.

यावेळी शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, उपनेते शंकर बोरकर, शिवसेनेचे उपनेते शरद कोळी, मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा प्रमुख रणजित पाटील, माजी तालुका प्रमुख अनिल शेंडगे, चेतन बोराडे, प्रल्हाद अडागळे हे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्याचे हे आरोग्य नव्हे अयोग्य मंत्री आहेत. आम्ही एकच तानाजींना ओळखतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी प्राणांची आहुती देणारे तानाजी मालुसरे होय. या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आणि पळ काढणाऱ्यास तानाजी नाव लावण्याचा अधिकार नाही. याचे एकच काम खोके वसुली करणे होय. कार्यकर्त्याच्या जागेला भाव मिळण्यासाठी नागरिकांचा विरोध असतानाही बसस्थानक हलवले. अशी जहरी टीका खासदार राऊत यांनी केली.  


खेकड्याला नाही वाघाला उमेदवारी देणार

उध्दव ठाकरे यांनी भूम येथील जाहीर सभेला भाषण सुरू करण्यापूर्वी खेकड्याने धरण फोडले सांगणाऱ्या खेकड्याने शिवसेना ही फोडायचा प्रयत्न केला. आपण भूम, परंडा, वाशी मतदारसंघातील जनतेची दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत मागच्या वेळेस वाघाला उमेदवारी देण्याऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत या खेकड्याची नांगी ठेसून वाघाला निवडणून द्या असे आवाहन त्यांनी केले.  


 
Top