परंडा (प्रतिनिधी) - परंडा येथे डी.बी.ए. समूहच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 व्या जयंतीनिमित्त डी.बी.ए. समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली डी.बी.ए.समूहचे कार्यालय परंडा - कुर्डूवाडी रोड येथे बैठक झाली. 14 एप्रिल 2024 रोजी येथील आठवडा बाजार याठिकाणी जयंती विविध कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.

यावेळी जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी महावीर बनसोडे यांची एक मतांनी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी अमर गायकवाड यांची निवड झाली. यावेळी बैठकीमध्ये ठराव घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर डी.बी. ए.  बचत गट काढण्याचे ठरले, विविध सांस्कृतिक कार्यक्रम,निराधार महिलांसाठी साडी वाटप, गोरगरीब हुशार गुणवत्ताधारक, विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, वही पेन, शालेय साहित्य वाटप,  आरोग्य रुग्णालयामध्ये फळ, वाटप व इमारत बांधकाम कामगार महामंडळ मोफत माहिती व मार्गदर्शन केले जाईल. ईत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. यावेळी पोलीस पाटील दिलीप परिहार, ॲड. दयानंद धेंडे, रणधीर मिसाळ, सरपंच चंद्रकांत परिहार, बौद्धाचार्य मनोज सिंगनाथ, वंचित बहुजन आघाडी प्रदीप परिहार, सतीश दाभाडे,संभाजी थोरात, दयानंद दाभाडे, सामाजिक नेते अभिमान सुतार, धम्म संदेश परिहार, परंडा  शहरातील भीमसैनिक व नागरिक मोठया संख्यने  उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार दयानंद बनसोडे यांनी मांडले.


 
Top