तुळजापूर (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी  दुपारी होताच  तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील मंदीर महाध्दार व मुख्ये  रस्ते व चौकातील सर्वच पक्षाचे असलेले डीझीटल बँनर हटवल्याने भाविकांसह शहरवासियांनी सुटकेचा श्वास घेतला.

तिर्थक्षेञ तुळजापूरात श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आलेल्या भाविकांना प्रथम देवी ऐवजी नेत्यांन सह हवश्या गवश्यांच्या   छबींचे दर्शन  घ्यावे लागत होते. नंतर  श्रीतुळजाभवानी दर्शन घडत होते. या बाबतीत भाविकांमधुन प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. माञ प्रशासन त्याची दखल घेत नव्हती. माञ आचारसंहिता लागताच डिझीटल बँनर काढले गेले व नेतेमंडळींच्या छबी दडविण्यासाठी अनेकांचे हात सरसावले. जे निवडणुक आयोग निवडणुक काळात करु शकते  ते प्रशासन वर्षभर का करु शकत असा सवाल होत आहे. निवडणुक आयोगात प्रशासनातील तेच आधिकारी असतात. तरीही हा दुजाभाव का ? असा सवाल होत आहे.  आचार संहिता लागताच कायद्याचे राज्य निर्माण होवुन सगळंचे नियमात  होत असल्याने हा बदल लोकशाहीतील मतदार राजाला हवाहवास वाटत असल्याचे त्यांच्या प्रतिक्रिया वरुन स्पष्ट होत आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात मागील सहा महिन्या पासुन सर्वञ मोठ्या संखेने डिजिटल लावले होते. यात सर्वाधिक डीजिटल हे महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार, भवानी रोड परिसरात होते. अक्षरशः मंदिर परिसराचे अस्तित्व या डिझीटलमध्ये हरवले होते. अखेर शनिवारी दुपारी तिन नंतर आचार संहिता लागू होताच डिजीटल माध्यमातून उंचीवर गेलेले आजी-माजी लोकप्रतिनिधी, भाऊ, अण्णा, दादा, काका, भैय्या सह अनेक नेते जमिनीवर उतरले. आचार संहिता संपपर्यत डिजीटल पासुन मुक्ती मिळणार असल्याने शहरावासियांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


कामांच्या फायली वेगाने हलल्या !

2024 चा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी  घोषित होणार यासंबंधीची माहिती शुक्रवारी निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आली होती. त्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या सावटाखाली जाणारी कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी शुक्रवार दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत अनेकांनी आपल्या कामांच्या फायलींना मंजूऱ्या घेऊन सुटकेचा नि:श्वास सोडला.


 
Top