धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद, धाराशिव चे नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील साहेब यांचे स्वागत व सत्कार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, राजर्षी शाहू महाराज शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुरेश भालेराव, माजी चेअरमन मिलिंद धावारे, सविताताई पांढरे, राजाभाऊ आकोसकर, प्रदीप तांबे, नागनाथ मुडबे, शाहू शिक्षक सोसायटीचे व्हाईस चेअरमन लहू जगताप, जगदीश जाकते, लक्ष्मण घोडके, शिवाजी साखरे, सोमनाथ केवटे, दत्तात्रेय नलावड, संजय गाडेकर, अल्पसंख्यांक शिक्षक सोसायटीचे संचालक काळे सर, ईलाही बागवान, बाळासाहेब कांबळे, धम्मदीप सवाई, सुधीर गायकवाड, चंद्रकांत मस्के, शिवलिंग हंकारे, दिनेश पेठे, रजनीकांत तुपारे, सुधीर डोलारे, दयानंद जेटीथोर, पवार सर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top