तुळजापूर (प्रतिनिधी) - शिवसेना अध्यक्ष तथा  माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे गुरुवार दि.7 मार्च रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर  दौऱ्यावर येत असुन या दौऱ्यात श्रीतुळजाभवानी दर्शन व जाहीर सभा असा कार्यक्रम असणार आहे.

 गुरुवार सांयकाळी उमरगा हुन  सांयकाळी  तुळजापूर  ला येणार आहेत  साडेआठ वा  आंबेडकर चौकात जनसंवाद सभा माध्यमातून जनतेशी संवाद साधणार  आहेत. नंतर राञी 9.30 वा श्री तुळजाभवानी दर्शनाला जाणार आहेत. देविदर्शन नंतर मुक्कामी धाराशिवला रवाना होणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांन मध्ये प्रचंड उत्साह संचारला असुन जय्यत तयारी  सुरु आहे. 

श्रीतुळजाभवानी  ही ठाकरे घराण्याची कुलदैवता आहे. ते सातत्याने  श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येवुन सहकुंटुंब सहपरिवार श्रीतुळजाभवानीची पुजाअर्चा करतात. पक्षफुटी नंतर प्रथमच श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येत असल्याने ते काय बोलणार याकडे तालुक्याचे नव्हे तर जिल्हयाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यातुन महाविकास आघाडीचा प्रचाराचा रणशिंग फुंकला जाणार आहे. शिवसेनेने तिर्थक्षेञ तुळजापूर भगवेमय करुन टाकले आहे.


 
Top