भूम (प्रतिनिधी)-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून कोण उभा राहणार यावरून मतदारसंघात अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहे. आगामी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातून मलाही खासदार व्हायचे म्हणून काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेले माजी मंत्री बसवराज पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री तथा भूम परंडा विधानसभेचे आमदार तानाजी सावंत, त्यांचे पुतणे माजी जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत. तसेच बऱ्याच दिवसापासून चर्चा असलेले सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुरेश बिराजदार हे इच्छुक आहेत. पण आजपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडला तर कुणीही उमेदवारी जाहीर केली नाही. तर उध्दव ठाकरे शिवसेनेच्यावतीने ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. असे जरी असले तरी  महायुतीकडून मात्र उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याचे पहायला मिळत आहे.

या मतदारसंघात भूम, परंडा,वाशी, कळब, बार्शी,तुळजापूर उमरगा व औसा या मतदारसंघात तालुक्याचा समावेश असून इच्छुक उमेदवार पैकी प्रत्येक जण मलाही खासदार व्हायचे म्हणून आपापल्या गॉडफादर मार्फत उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. सध्या तरी प्रत्येक जण विविध समीकरणे काढून मीच खासदार होणार असल्याचे स्वप्न रंगवत आहे. आज पर्यंत या मतदारसंघातून काँग्रेस, शिवसेना व फक्त एक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस यांचा या मतदारसंघावर झेंडा फडकलेला आहे. त्यामुळे यावेळी बाण, कमळ, मशाल यापैकी कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. 


 
Top