भूम (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीसाठी मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समिती भीमनगर पेठ भूमचे गठन करण्यात आले. या समितीच्या अध्यक्ष पदी अमोल शिंदे व उपाध्यक्ष पदी आकाश कोरडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बुधवार दि.13 रोजी भीमनगर पेठ भूम येथे भीम अनुयायांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी कोषाध्यक्षपदी धिरज शिंदे , सचिवपदी अक्षय गायकवाड, मिरवणूक प्रमुख रोहित गायकवाड, सचिन शिंदे, कुंदन शिंदे, यशपाल गायकवाड, किरण शिंदे, नितीन इजगज, स्वप्नील जानराव अनिकेत सावंत यांच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या. यावेळी युवक व जेष्ठ नागरिक मोठया संख्येने हजर होते.


 
Top