भूम (प्रतिनिधी)- भूम परंडा मतदार संघाचे आमदार तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातच अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. आरोग्य मंत्री पदे भरून या बाबीकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडलेला आहे.  तालुक्यातील आरोग्य विभागातील एकूण 71 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामुळे भूम-परंडा तालुक्यातील आरोग्य सेवा कोलमडली आहे.

वैद्यकीय अधिकारी 6, औषध निर्माता, 2, आरोग्य सहाय्यक 2, आरोग्य सेवक पुरुष 9, आरोग्य सेविका 16, कुष्ठरोग तंत्रज्ञ 5, कनिष्ठ सहाय्यक, वाहन चालक 5, सफाई कामगार 5, परिचर 13, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3 व कनिष्ठ लिपिक 1, लिपिक टंकलेखक 1, सहाय्यक अध्यक्ष, 1 असे एकूण 71 पदे रिक्त आहेत. तालुका आरोग्य विभागाची वर्ग 2, 3 व वर्ग 4 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदे भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर मागणी केली आहे. तालुक्यातील 68 व भूम ग्रामीण रुग्णालयातील 3 अशी एकूण 71 पदे रिक्त आहेत.


 
Top