धाराशिव (प्रतिनिधी)-आगामी काळात होणारे निवडणूका, सनउत्सव, जयंतीच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक, धाराशिव अतुल कुलकर्णी, यांचे आदेशान्वये मालमत्तेसंबंधी आरोपींचा तसेच विविध गुन्ह्यातील पाहीजे, फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी लक्ष्मी पारधीपीढी, तेरखेडा येथे दि. 03.03.2024 रोजी 04.00 ते 09.00 वा. सु.  कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

नमुद कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान खालील 06 संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. संतोष लाला काळे, वय 34 वर्षे,  प्रशांत उर्फ सचिन बापू पवार, वय 25 वर्षे,  राजेंद्र उर्फ राजा बप्पा काळे, वय 30 वर्षे, अभिजीत उर्फ तावऱ्या शंकर पवार, वय 28 वर्षे, आर्यन उर्फ काळ्या अमोल काळे, वय 27 वर्षे, विकास उर्फ बहिऱ्या मच्छिंद्र काळे, वय 27 वर्षे, सर्व रा. लक्ष्मी पारधी पीढी, तेरखेडा. वर नमुद इसमांकडे चौकशी केली असता नमुद इसम हे पो ठाणे येरमाळा, पो. ठाणे नळदुर्ग विविध गुन्हा प्रकरणी पाहीजे होते. सदर आरोपी कोबिंग ऑपरेशनमध्ये सापडले.

सदर कोंबिंग ऑपरेशन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व  गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीकारी, स्वप्नील राठोड, सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  वासुदेव मोरे,  यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, पो. ठाणे धाराशिव शहर, पो ठाणे धाराशिव ग्रामीण, पो. ठाणे आनंदनगर व पोलीस नियत्रंण कक्ष, धाराशिव येथील एकुण 6 पोलीस निरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 01 पोलीस उप निरीक्षक, 50 पुरुष पोलीस अमंलदार, 22 महिला पोलीस अमंलदार, 12 गृह रक्षक दलाचे जवान, 11 सरकारी वाहने व त्यांचे चालक यांनी राबविले.


 
Top