धाराशिव (प्रतिनिधी)-अहमदनगर, बीड, धाराशिव जिल्ह्यात मोटारसायकल व शेळ्या चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली असून, पोलिसांनी 2 लाख रूपयांचा माल जप्त केला आहे. 

याबाबत अधिक माहित अशी की, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, येरमाळा येथील सिड फार्म येथे काही इसम चोरीच्या मोटरसायकल व शेळ्या विक्रीसाठी थांबलेले आहेत. त्यावर पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी बालाजी गणपत काळे, वय 31 वर्षे रा. आंदोरा ता. कळंब जि. धाराशिव, विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे अन्य चार साथीदार यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील 4 गुन्हे व बीड व अहमदनगर जिल्ह्यातील 2 गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावर पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील 4 मोटरसायकल व 6 बोकड, 6 शेळ्या असा एकुण 2 लाख 55 हजार रूपये किंमतीचा माल हस्तगत केला. नमुद आरोपीस चोरीच्या मालासह तामलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.व इतर चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे,  नितीन जाधवर, बबन जाधवर,रवि आरसेवाड, अशोक ढागारे, चालक महेबुब अरब, प्रशांत किवंडे  यांच्या पथकाने केली आहे.


 
Top