भूम (प्रतिनिधी)- सौ. कमल भीमराव घुले फाउंडेशनच्या वतीने लवकरच उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील गरजवंत लोकांना मोफत ऑपरेशनची सुविधा चालू करून देणार असल्याची माहिती डॉ. राहुल घुले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली

भूम, परंडा, वाशी तालुक्यातील शेकडो रुग्णांवर मोफत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान देण्याचे कार्य डॉ. राहुल घुले त्यांचे बंधू डॉ. अमोल घुले यांच्या माध्यमातून आणि सौ. कमल घुले फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले. आता लवकरच  धाराशिव जिल्ह्यामध्ये थोड्याच दिवसांमध्ये भव्य असे मोफत आरोग्य सेवा देण्यासाठीचे सौ. कमल घुले फाउंडेशनच्या नावाने कार्यालय सुरुवात करण्यात येणार आहे. 

या सुवर्णसंधीचा लाभ उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तळागाळातील सर्व समाज बांधवांनी घ्यावा अशी अपेक्षा करून भविष्यात शेतकऱ्यांच्या डी.पी. ची (विद्युत वाहिनी) उचलणे आणून बसविणे करण्याची जी सुविधा भूम परंडा वाशी तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ही सुविधा चालू करून देणार असल्याचे मानस डॉक्टर राहुल घुले यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.


 
Top