धाराशिव (प्रतिनिधी) - अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी मराठा महासंघाच्यावतीने दि.23 मार्च रोजी साजरी करण्यात आली.

धाराशिव शहरातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या संपर्क कार्यालयात अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता जाधव, सुनील बारकुल, अप्पासाहेब लोंढे, विशाल गायकवाड, अण्णा गव्हाणे आदी उपस्थित होते.


 
Top