धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा शेतकरी कष्टकरी गोरगरीब अशा सगळ्यांची बांधिलकी जोपासण्यासाठी काम करणार असल्याचे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके यांनी व्यक्त केले. आज शनिवारी दि.23 रोजी शहरातील भाजपा भवन येथे धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सोळंके पुढे बोलताना म्हणाले की, किसान मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्यात संघटना बळकट करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार आपुलकी वाटेल. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करत असून, त्यांना शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवून शेतकऱ्यांचे जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत असल्याचे शेवटी सोळंके यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याचबरोबर वाशी तालुक्यात 38 गावात ग्राम परिक्रमा कार्यक्रम केल्याबद्दलभारतीय जनता पार्टीचेचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बैठकीस सुरुवात करण्यात आली. या बैठकीत धाराशिव लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव रामदास कोळगे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर यांनी विचार व्यक्त केले. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य संजय पाटील, नानासाहेब कदम, भागवत खोत, किसन पाटील, दमशेट्टी बाबुराव चव्हाण, प्रवीण साळुंखे, अंगद जाधव, संजय कुलकर्णी, रंगनाथ कोळगे, संदीप शहा, डॉ. भाग्योदय देशमुख, अशोक मडके, अँड लक्ष्मण कोकाटे, पांडुरंग पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. बैठकीची प्रस्तावना जिल्हाध्यक्ष अँड संतोष सूर्यवंशी यांनी केली. बैठकीसचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस प्रशांत माने तर आभार अर्जुन कदम यांनी मानले.