धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे पंचायतराज, पर्यटन तथा ग्रामविकास मंत्री. गिरीष महाजन यांचा सोलापूर येथे नियोजित दौरा असल्याने धाराशिव विमानतळावर आगमन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख  नितीन काळे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण विकास आणि धार्मिक स्थळे पर्यटनाच्या अनुषंगाने विकसित करण्याबाबत निवेदनही त्यांना देण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील व लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची त्यांनी माहिती घेऊन महायुतीच्या कालखंडात आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या  माध्यमातून धाराशिव बदलतय हे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील महायुतीचे सरकार हे ग्रामीण भागातील विकासासाठी सदैव कार्यतत्पर असून धाराशिव मध्ये पर्यटन विकसित करून रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन पंचायतराज, ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री मा.ना.श्री. गिरीषजी महाजन यांनी यावेळी दिले.  

यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य युवराज नळे, शहराध्यक्ष अभय इंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिताताई कांबळे, माजी जिल्हा परिषद सभापती ऍड.दत्तात्रय देवळकर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, संदीप इंगळे, विद्या माने, देवा नाईकल, प्रवीण सिरसाटे, विकास राठोड यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top