जळकोट (प्रतिनिधी) -तुळजापूर तालुक्यातील जळकोट पासून अवघे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानमोडी येथील रहिवाशी मात्र सद्यस्थितीत हिंद इंग्लिश मेडियम स्कूल, विमाननगर, पुणे येथे इयत्ता पहिलीपासून शिक्षण घेत असलेली व इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेली कु. अदिती कडाजी थोरात या विद्यार्थिनीने अल्पवयात किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व ब्रांझ अशी तब्बल अकरा पदके मिळवली आहेत. तिने अल्पवयात केलेल्या उत्तुंग कामगिरीमुळे तिचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे.

तुळजापूर तालुक्यातील जळकोट पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानमोडी सारख्या अत्यंत ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या कु. अदितीचे आई-वडील हे शेतमजूर आहेत. गावात कुटुंबाचा उदरनिर्वाह भागात नसल्याने त्यांनी कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी तिच्या जन्मानंतर पुणे येथे स्थायिक झाले. तिचे उपजत गुण लक्षात घेऊन तिच्या आई-वडिलांनी दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळेत प्रवेश घेतला. सदर हिंद इंग्लिश मीडियम स्कूल, विमाननगर, पुणे येथे शिक्षणासोबतच किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात अदितीने भाग घेण्यास सुरुवात करून सन 2019 पासून अहमदनगर, पुणे, सोलापूर, गोवा, उत्तराखंड राज्यातील डेहराडून आदी विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तब्बल सहा सुवर्णपदक, चार रौप्य पदक व एक ब्रांझ पदक अशी एकुण अकरा पदके मिळवली आहेत.  त्यामध्ये ए ग्रेड येलो बेल्ट, ग्रीन बेल्ट, ऑरेंज बेल्ट असे सन्मान ही आदितीने मिळवले आहेत. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करून यापुढेही उत्तुंग यश मिळवत राहो अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. विद्यमान 8 मार्च या महिला दिनाच्या निमित्ताने तिचे विशेष कौतुक केले जात आहे.


 
Top