धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील विद्याधन अकॅडमीच्या सहा विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल राष्टवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या वतीने अकॅडमी येथे मंगळवारी (दि.19) सायंकाळी शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांमध्ये अदिती गोडसे, शाक्य सरवदे, सागर घोडके, वैभवी केंद्रे, सुमेध सरवदे, साईकृष्ण माने यांचा समावेश आहे. यावेळी दुधगावकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह अकॅडमीचे प्रमुख स्पप्नील पाटील व त्यांच्या सर्व सहकारांना शुभेच्छा देत यापुढील काळात सर्व शैक्षणिक परिक्षेमध्ये उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करण्याचे आवाहन केले. यावेळी अनिल जाधव, पांडूरंग मते, दादासाहेब घोडके यांच्यासह विद्यार्थी व पालक आदींची उपस्थिती होती. यावेळी तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेतील 50 विद्यार्थ्यांचे सैनिक स्कूल शाळेत पास झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रहिमान सय्यद, जगन्नाथ धायगुडे, बाळासाहेब जमाले, श्रीमती आंबिका कोळी, शहाजी पुरी, रामकृष्ण ढवळे यांचेही जाहीर अभिनंदन केले.