भूम (प्रतिनिधी)- कसबा येथील श्रीकृष्ण मंदिराचा नव्याने जिर्नोद्धार करुन मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण कार्यक्रम परमहंस परिव्राजकाचार्य जगतगुरु शंकराचार्य विद्या-नृसिंह  भारती स्वामी महाराज करवीर पीठ कोल्हापुर यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.

या निमित्ताने कलशाची व विठ्ठल रुक्मिणीची मुर्तीची कसबा विभागातुन ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.या निमित्ताने तीन दिवस वेदमुर्ती पारखी शास्री पुणे यांच्या उपस्थितीत होम हवन आदी कार्यक्रम पार पडले.

या निमित्ताने कलशा रोहन व मुर्ती प्रतिष्ठापणा नंतर महाआरती व यानंतर संतोष देशमुख यांच्या वतीन  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले..तसेच रात्री हरीजागराने कार्यक्रमाची सांगता झाली. मंदिराच्या कलशरोहनाच्या कार्यक्रमासाठी सासुरवासीन लेकीने हजेरी लावली होती. या शिवाय शहरातील भाविकांची मोठी गर्दी दिसुन आली.

गेल्या दोन वर्षापासून पुरातन श्रीकृष्ण मंदीराच्या जिर्नोद्धाराचे काम सुरु होते. हे काम पुर्ण झाल्याने नव्याने कलश रोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संतोष देशमुख, दत्तन देशमुख, आनंद बेलसरे, मकरंद बेलसरे, प्रदिप देशमुख, सुमंत देशमुख, विलासराव देशमुख, किशोर वंजारवाडकर, मनिष राजोपाध्ये, प्रशांत बुरटे यांच्यासह सेवेधरी मंडळीन विशेष परिश्रम घेतले.


 
Top