धाराशिव (प्रतिनिधी)-विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच करत असते.

आळणी ता. धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारीदिनांक 15मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमा पूजन आणि कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी मा.श्री.शिवाजी फाटक साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी श्री मल्हारी माने साहेब श्री.जंगम साहेब ,श्री. देवगुडे साहेब, येडशी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. प्रकाश पारवे साहेब,धाराशिव ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री बनसोडे साहेब केंद्रप्रमुख नागटिळक साहेब, श्री.राठोड साहेब, गावचे उपसरपंच श्री.कृष्णा गाडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार नांदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री.श्याम बापू लावंड, पोलीस पाटील श्री. प्रमोद माळी, ग्रामपंचायत सदस्य विनोद मामा लावंड,श्री.अक्षय कदम, सौ.संजीवनी पौळ , श्री.जीवनराव गोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मडके सर शिक्षक संघटनेचे नेते श्री. मेंढेकर सर एकल शिक्षक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष श्री.पवन सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी , श्री दीपक हजारें यांच्या हस्ते करण्यात आले.शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेशाच्या नृत्याने झाली. यावेळी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी शिवनेरी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रसाद भैय्या वीर ,श्री.पोपट कोळी ,श्री.सतीश कदम, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष श्री.धर्मराज भैय्या सूर्यवंशी मित्र मंडळ, श्री. पवन भैया मित्र मंडळ, माऊली नाष्टा सेंटर गडपाटी चे मालक श्री. वैभव चौगुले, तुळजाई उद्योग समूहाचे मालक श्री.विजय माळकर साहेब, पत्रकार श्री.राहुल कोरे, श्री. रवी कोरे,श्री. शिवाजी डांगे सर, श्री.भांडेकर सर, श्री. शिवदास चौगुले सर श्री. संभाजी वीर सर आणि गावातील सर्व प्रतिष्ठित व हजारो नागरिक उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी पालकांनीही खिसा रिकामा करत हजारो रुपये बक्षीस दिले. चौथीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले जहर घेऊ नका या गीताने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमप्रसंगी श्री.पोपट कोळी यांनी शाळेसाठी दोन डिश टिव्ही भेट दिले. पाच तासापेक्षा जास्त वेळ कार्यक्रम अतिशय दर्जेदार चालला पण एकही पालक व नागरिक जागेवरून हलला नाही. कार्यक्रमासाठी हजारो नागरिक व पालक उपस्थित होते, शाळेचे ग्राउंड अपुरे पडल्यामुळे शेकडे महिला व पुरुष नकरिकांना कार्यक्रम न पाहतातच परतावे लागले याबद्दल मुख्याध्यापक यांनी खंत व्यक्त केली. सहशिक्षिका श्रीम.सत्यशिला म्हेत्रे यांनी अनोख्या पद्धतीने सूत्र संचालन केले. श्रीमती वर्षा डोंगरे, सुनिता कराड, क्रांती मते, मंजुषा नरवटे, सुलक्षणा ढगे, राधाबाई वीर,श्री. दिनेश पेठे,उत्तम काळे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. तर आभार 

श्री.हनुमंत माने यांनी मानले.


 
Top