परंडा(प्रतिनिधी) -मराठा समाजाला आरक्षण मिळऊन दिल्याशिवाय एक इंच देखील मागे हटणार नाही. भ्रष्ट्राचारी नेत्यांची चौकशी करायची सोडून सरकारने माझी चौकशी लावली आहे.

तीन दिवसा पासुन चौकशी समितीची वाट बघत आहे. पुन्हा समाजाने आक्षणासाठी सरकारशी लढण्यासाठी एकजूटीने सज्ज व्हावे. असे आवाहन मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी परंडा येथे रविवार (दि.3) रोजी समाजाशी संवाद साधताना केले.पाटील यांचा संवाद दौरा सुरु झाला आहे.त्यांनी भूम नंतर परंडा येथील समाजाशी शहरातील महाराणा प्रताप चौक (बावची चौक) संवाद साधला. दरम्यान पाटील यांचे सकल मराठा समाजच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले . श्री विठ्ठलाची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. उद्योजक रामभाऊ पवार यांच्या सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या आयसीयू विभागाचे मनोज पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. विविध संघटना तसेच मुस्लीम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला .यावेळी त्यांनी मराठा समाजाशी संवाद साधताना म्हटले कि, भ्रष्ट्राचारी पुढाऱ्यांची चौकशी करायची सोडून माझी चौकशी लावली. मी चौकशीला घाबरणारा नाही. तीन दिवसांपासुन चौकशी समितीची वाट पाहिले व संवाद दौरा सुरू केला. 10 टक्के आरक्षण आपल्या कामाचे नाही. ते अर्धवट असून त्याचा लाभ राज्य मर्यादित आहे. आपल्या लेकरांना उच्च शिक्षणात लाभदायक नाही. हे तुम्हा आम्हाला मान्य नसलेले आरक्षण सरकार लादण्याचा प्रयत्न करीत आहे. मी मान्य केले नाही म्हणून माझ्यावर दबाव टाकीत आहेत. म्हणूनच एसआयटी चौकशी लावली गेली आहे. मी या चौकशीला घाबरनारा नाही. जेल मध्ये जायला तयार आहे. पण पूर्ण ओबीसीतूनच आरक्षण घेणार. यावेळी हजारो सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.


 
Top