तुळजापूर (प्रतिनिधी)- भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट  प्रथमच आमच्या जागतिक मुख्यालय, कान्हा शांती वनम  रंगारेडी तेलंगणा येथे “जागतिक अध्यात्म महोत्सव“ करीत  असुन यासाठी  तिर्थक्षेञ तुळजापूर  येथील श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे  महंत तुकोजीबुवा, गुरु बजाजीबुवा यांना सन्माननीय अतिथी म्हणून आमंञित करण्यात आले आहे.

सदरील  परिषद तारखा 14 ते 17 मार्च 2024  कालावधीत संपन्न होत आहे. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी 15 मार्च रोजी उत्सवाचे उद्घाटन करतील. तर उपाध्यक्ष जगदीप धनकर अधिवेशनाचा समारोप करतील. 


 
Top