तुळजापूर (प्रतिनिधी)-प्रत्येक महिलेने आपल्या पुढच्या पिढीला शिक्षीत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन  मुख्याधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदाळकर (भा.प्र.से.) यांनी जागतिक दिन व मुख्यमंञी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजीत विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत महिलांच्या सत्कार सोहळ्यात केले.

प्रारंभी  मुख्याधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदाळकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर  विविध क्षेत्रातील 55 महिलांचा सन्मान श्रीमती प्रियंवदा म्हाडदाळकर यांच्या शुभहस्ते फेटे बांधुन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी त्यांनी उपस्थित महिलांना आपल्या पुढील आव्हाने व त्यांना कसे सामोरे जावे या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  केवळ शिक्षणामुळेच या गोष्टी साध्य होतात.  प्रत्येक महिलेने आपल्या पुढच्या पिढीला शिक्षीत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात न.प.शाळा क्र. 1 व 2 मधील विद्यार्थ्यांनी समयोचीत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  महेंद्र कावरे यांनी केले. आभार प्रदर्शन पुष्पांजली मंगरुळे यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय साळुंके, तुळजापूर नगरपरिषद पतसंस्थेच्या चेअरमन प्रफुल्लता बरुरकर, पूजा एखंडे, महेजबीन शेख, अरुणा रोकडे, शोभा कांबळे, जयश्री कांबळे इत्यादींनी परिश्रम घेतले.


 
Top