तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सलगरा दिवटी येथील योगेश केदार यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना आगामी निवडणुकांन  पार्श्वभूमीवर  शिवसेना प्रवक्ते पदी निवड करण्यात आली.

योगेश केदार हे यापूर्वी माजी खासदार छञपती संभाजीराजे यांचे सचिव होते. सोलापूर-तुळजापूर. धाराशिव रेल्वे प्रकल्प मंजूर करून आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. धाराशिव जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय मंजूर करून आणले. धाराशिव आणि लातूर जिल्ह्या करता गॅस पाइपलाइनची योजना आणली आहे. काही दिवसांपूर्वी तेर येथील गोरोबा काका मंदिराला 'अ' वर्ग दर्जा मिळवून दिला. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ष निवास स्थानी मराठा आंदोलनातील प्रमुख  चेहऱ्यांपैकी एक असणाऱ्या योगेश केदार यांचा पक्ष प्रवेश करून घेतला. त्यांना पक्षाच्या प्रवक्ते पदाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली.  आता यापुढे ते मनोज जरांगे आणि सरकार यांच्या मध्ये दुवा साधणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.


 
Top