कळंब (प्रतिनिधी)-अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन तिसवाडी तालुक्यातील ओल्ड गोवा उपपिठावरील शिवमंदिरातील बुधवार  दि. 21 व मार्च या दिवशी सकाळी 9 वाजपासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 21 मार्च 2024 रोजी  नवीन उपासकांना उपासक दीक्षा देण्यात येणार आहे.

भारतीय संस्कृतीने ऋषीमूनींच्या संकलित विचाराने घडलेले अध्यात्म होय. अध्यात्माची परिभाषा कळली की जीवनाचा कायापालट होतो. हेच अध्यात्म जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज आपल्या रसाळ वाणीने भक्तांना सांगतात. विज्ञानाची सांगड घालून जीवन कसे जगावे यावर मार्गदर्शन करत असतात. विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून मानवास येणाऱ्या समस्यांवर देखील यावेळी मार्गदर्शन केले जाते.

संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. यात ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय उपक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, आपत्कालीन मदत उपक्रम यासारखे राबविले जातात. ब्लड इन निड उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णास काही मिनिटात संस्थानच्यावतीने रक्त उपलब्ध करून दिले जाते. याअगोदर संस्थानच्या वतीने लष्करातील सैनिकांसाठी हजारो रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले आहे. याही वर्षी प्रत्येक सेवा केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सामाजिक व अध्यात्मिक कार्य करणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ भाविकांनी घेऊन त्यांचे मौलिक विचार ऐकावे असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या उप्‌‍ पीठ गोवा उपपीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

उपक्रम यासारखे राबविले जातात. ब्लड इन निड उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णास काही मिनिटात संस्थानच्यावतीने रक्त उपलब्ध करून दिले जाते. याअगोदर संस्थानच्या वतीने लष्करातील सैनिकांसाठी हजारो रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले आहे. याही वर्षी प्रत्येक सेवा केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सामाजिक व अध्यात्मिक कार्य करणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ भाविकांनी घेऊन त्यांचे मौलिक विचार ऐकावे असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या गोवा उपपीठ व्यवस्थापक शैलेश काळे यांनी उपपीठच्या वतीने देण्यात  आले आहे.


 
Top