तुळजापूर (प्रतिनिधी)- येथे  पंचाहत्तर वर्षापासून सेवेत असलेल्या महेश अँटो गँरजचे प्रमुख प्रफुल्लकुमार व धनंजय शेटे  यांनी ग्राहकांची  केलेल्या  प्रामाणिक सेवेमुळे पंचाहत्तर वर्ष झाले तरीही यांच्या गॅरजेचे नावलौकीक कायम असल्यान न्यु महेश अँटो अण्णा शेटे  गँरेज ग्राहकांच्या पंसतीस निश्चित उतरेल असे प्रतिपादन महेश ॲटो अण्णा शेटे गॅरेजचा शुभारंभ प्रसंगी रामचंद्र बसवणप्पा आलुरे (सरपंच, अणदुर, तथा सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर) यांनी केले.

यावेळी बोलताना  महेश रामचंद्र आलुरे म्हणाले कि  महेश ॲटो गॅरेजचे उदघाटन माझे चुलते कै. आ. सि.ना.आलुरे गुरुजी यांनी केले. तर  न्यु महेश अँटो अण्णा गँरजेचे उदघाटन करण्याचे भाग्य मला लाभले हे सचोटी व प्रामाणिक पणाचे लक्षण असल्याचे सांगितले. यावेळी कैलास बोंगरगे सर, नवनाथ शेंदारकर दत्ता कोरे, शिवदर्शन बिराजदार, शरद बिराजदार, कालीदास जाधव, नाना मोगरकर, सचिन वाले, ॲड. गिरीष शेटे. प्रफुल्लकुमार शेटे, धनंजय शेटे, प्रशांत उमेश शेटे, अमित बाबुराव परमशेट्टी, ओंकार शेटे सह शेट परिवार नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top