भूम (प्रतिनिधी)-येथील श्री गुरुदेव दत्त हायस्कूल मध्ये 24x7 फाउंडेशन मार्फत 09 मुलींना सायकल बँक योजनेअंतर्गत सायकली वाटप करण्यात आल्या. पालकमंत्री धाराशिव डॉ. तानाजी सावंत  यांच्या संकल्पनेतून गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने 09 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोटे, प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी धाराशिव श्रीमती अर्चनाताई दराडे व भूम शहराध्यक्षा महिला आघाडी सौ. ज्योती बाराते, संस्थेचे सचिव सतीश देशमुख, दत्ता भालेराव तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते


 
Top