भूम (प्रतिनिधी)-आयोध्या येथुन प्रभू श्री राम लल्लाच दर्शन घेऊन आलेल्या राम भक्तांच भारतीय जनता पार्टीच्यावतीने बसस्थानक भूम व माणकेश्वर येथे गुलाब पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी प्रभू श्रीरामाचा जयजयकार करण्यात आला .

मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम भक्तांना दर्शन मिळावे यासाठी मोफत संधी मिळवून दिली. यासाठीच संपूर्ण नियोजन आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,  जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील,  भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर यांच्या समन्वयातून तालुक्यातील 120 रामभक्तांना आयोध्या दर्शनासाठी अगदी मोफत संधी उपलब्ध करून दिली गेली. त्याप्रमाणे 120 राम भक्त आयोध्याकडे रवाना झाले होते. सर्व रामभक्त रविवार दि. 10 मार्च रोजी भूम शहरात परतल्यानंतर सर्व राम भक्तांचा येथे उतरल्या बरोबर भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रत्येकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार आणि स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कवडे, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, अंगद मुरूमकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी आदि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top