भूम (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यानिमित्ताने आपल्या कुटुंबाला पुढे घेउन जाण्यासाठी लोकांची धुनी-भांडी करणाऱ्या महिला कामगारांचा व आपले कुटुंब सांभाळून पोलीस खात्यातील अवघड कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला पोलिसांचा ही सन्मान करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे उदघाटन पोलिस उपनिरीक्षक वर्षा साबळे यांच्या हस्ते व प्राचार्या कल्याणी असलकर यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी शाळेतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील घरकाम करणाऱ्या महिला कामगार  मेघा जव्हेरी, पार्वती राऊत,सुवर्ना ढगे, रेणुका बोत्रे, रुकमीन राऊत, जयश्री पंडारे, बबिता ताई व मीना कोकणे यांचा पोलिस उपनिरीक्षक वर्षा साबळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तर महिला पोलीस कर्मचारी रेखा काळे, शबाना मुल्ला, वैशाली राजपूत, बेले मॅडम, साठे मॅडम यांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला. 

स्पर्धेमध्ये सरला गजानन बागडे व प्रियांका प्रशांत असलकर या विजयी झाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा सुपेकर यांनी केले. तर आभार चैताली टकले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका दिपीका टकले, सरस्वती पाटील यांच्यासह अरुणा बोत्रे व आशा म्हेत्रे यांनी परिश्रम केले.


 
Top