तुळजापूर (प्रतिनिधी)-  स्ञी शक्ती देवता  श्रीतुळजाभवानी  मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीत महिलांसाठीचे शौचालय व स्वछतागृहांची कमतरता देवी दर्शनार्थ येणाऱ्या महिला भाविकांची कुंचबना होत आहे. या महिलांच्या प्रमुख समस्याकडे  दुर्लक्ष करीत असल्याने या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरला श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ कोट्यावधी भक्त येतात. यात महिला भक्तांची संख्या पन्नास ते साठ टक्के आहे. श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ महिला भक्तांची संख्या वाढली पण स्वछतागृहची संख्या वाढली नाही. यामुळे महिलांची कुंचबना वाढली. तिर्थक्षेञी शहरवासियांची व भाविकांची संख्या वाढत असताना स्वछतागृहाची संख्या वाढणे गरजेचे असताना ती कमी होत असल्याचे चिञ सध्या दिसुन येत आहे. नगरपरिषदचे असणारे स्वछतागृह, शौचालये  स्वच्छ केले जात नसल्याने व पुरेसे पाणी नसल्याने अस्वच्छ बनले आहेत. यामुळे महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत असल्याने त्यांना उघड्यावर मुलभुत गरज भागविण्यासाठी जावे लागत आहे.

तिर्थक्षेञी कोट्यावधीचे विकास काम झाले पण यात स्वछतागृह शौचालय माञ झाले नाहीत. काही शौचालये, स्वछतागृह  तर बांधल्यानंतर काही महिने चालु झाले नंतर बंद झाली. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे अत्यल्प दरात पे शौचालय स्किम आली. पण काही राजकिय पक्षांचा विरोधामुळे ती रद्द झाली. सध्या महिलांना पैसे देवुन शौचालय, स्वछतागृहाचा वापर करावा लागत आहे. यात याचा फटका गरीब वर्गातील महिला भाविकांना बसत आहे. 
Top