तुळजापूर (प्रतिनिधी) -तालुक्यातील मौजे दिंडेगाव येथील श्री संत सद्गुरू शिवराम बुवा महाराज यात्रेची काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सांगता. हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. 

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत सद्गुरू शिवराम बुवा महाराज यात्रा विविध धार्मिक उपक्रम राबवत साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीस येथील यात्रेस प्रारंभ झाला तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता रविवार दि.10 मार्च रोजी काल्याच्या कार्यक्रमाने करण्यात आली. इटकळ परिसरात सर्वात मोठी साजरी होणारी ही यात्रा या यात्रेस तुळजापूर उमरगा अक्कलकोट सोलापूर धाराशिव आदी भागातून बहुसंख्य भाविक सद्गुरू शिवराम बुवा महाराज यांच्या दर्शनासाठी उपस्थिती दर्शवली. वारकरी भाविक पुरूषासह महिलांची ही उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली. सद्गुरू शिवराम बुवा महाराज यात्रा महोत्सव उत्साहात पार पडावा यात्रेत कसल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इटकळ औट पोस्ट पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.


 
Top