तुळजापूर  (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेची चैञी पोर्णिमा याञा  21 ते 25 एप्रिल,2024 या कालावधीत संपन्न होत आहे. सदर यात्रेस येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात व यात्रा महोत्सव सुरळीतपणे संपन्न व्हावा. या दृष्टीकोनातून यात्रेच्या पूर्वनियोजनाची बैठक  शुक्रवार दि. 15 मार्च रोजी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात संपन्न झाली.

या बैठकीस  श्रीतुळजाभवानी मातेचे महंत तुकोजीबुवा महंत हमरोजी बुवा विश्वस्त तथा तहसिलदार अरविंद बोळंगे प्रशासकीयधिकारीतथातहसीलदार सोमनाथ वाडकर मुख्याधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर  पो नि खांडेकर सहाय्यकधार्मिकव्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले ओंकार काटकर पुजारी मंडळाचे विपीन शिंदे उपाध्य मंडळाचे अनंत कोंडो सह विविध खात्याचे प्रमुख  अधिकारी उपस्थितीत होते.

या चैञी याञा कालावधीत धार्मिक विधी पुर्वपार परंपरे नुसार करणे. मंदीर सलग बावीस तास मंदीर दर्शनार्थ खुले ठेवणे  भाविकांच्या स्नानाची सोय होण्यासाठी घाटशिळ वाहनतळा जवळील भवानी तिर्थकुंड खुले ठेवणे या बाबतीत चर्चा झाली. तसेच मंदिरात एक कंट्रोल रुमची स्थापना याञा कालावधीत  करणे.  विद्युत पुरवठा व  पाणी पुरवठयाचा विजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेणे. पाणीपुरवठ्याचे सर्व जलस्त्रोताची पाहणी करुन उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करुन याचा आराखडा सादर करण्याचा सुचना देण्यात आली.  तसेच शहरातील मुख्य गर्दीच्या भागांमध्ये यात्रा कालावधीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे.अशा सुचना देण्यात आली. मंदिरात भाविकांशी पोलिस व पुजाऱ्यांनी सौजन्याने वागावे अशी सुचना प्रमुखांना देण्यात आली.


 
Top