तुळजापूर (प्रतिनिधी)- मी भाजप मध्ये जाणार अशा बातम्या पेरण्या मागे मोठे षढयंञ असल्याचे सांगुन  मी भाजपमध्ये जाणार नसुन काँग्रेस मध्येच राहणार असल्याचा  खुलासा माजीमंञी  मधुकर चव्हाण यांनी पञकार परिषद घेवुन केला.

पञकारांशी संवाद साधताना चव्हाण पुढे म्हणाले कि, मी प्रकृती अवस्थामुळे हाँस्पीटल मध्ये असताना मी भाजपत जाणार अशा बातम्या पेरणे या मागे मोठे षढयंञ असल्याचे स्पष्ट करुन हे मी खपवुन घेणार नसल्याचा इशारा यावेळी दिला. मी भाजपात जाणार अशा बातम्या पेरणे  यामागे मोठे षढयंञ असल्याचे सांगुन ते मी शोधणार आहे. मी भाजपात जाणार नसुन काँग्रेस मध्येच राहणार आहे. मी भाजपात जाणार यामुळे मला अनेकांचे  फोन आल्याने याचा मला ञास सहन करावा लागला. महाविकास आघाडी उमेदवाराचा प्रचार करणार असे यावेळी स्पष्ट केले.

विकास कामे मंजूर नसताना मंजूर असल्याचे दावे करुन मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सताधारी कडुन चालु आहे. सत्तेतुन पैसा पैशातुन सत्ता असा खेळ निवडणूक तोंडावर चालु असल्याचा आरोप यावेळी केला. तालुक्यात पुतळे बसविण्यापेक्षा छञपती संभाजी राजे पुतळा कुलुपातुन मुक्त करा असे आवाहन यावेळी केले. यावेळी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष अँड. धिरज कदम पाटील उपस्थिती होते.


 
Top