धाराशिव (प्रतिनिधी)-कळंब तालुक्यातील चोराखळी येथील व सध्या शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद नवले चोराखळीकर यांचे सुपुत्र अमित नवले तसेच  कै प्रोफेसर संजय नवले व सुनिल नवले यांचे पुतणे अमित यांचे 12 मार्च 2024 रोजी  रात्री आठ वाजून सात मिनिटांनी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर उदगीर येथे 14 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अमित मागील चार 8 दिवसापासून एन आर एस हॉस्पिटल पुणे येथे सायनस वर ट्रीटमेंट घेत होते. त्यानंतर जैन ई एन टी हॉस्पिटल जयपूर येथे सर्जरीसाठी ऍडमिट केले होते. सर्जरी करीत असतानाच अमितला ब्रेन्स्त्रोक झाला त्यामुळं त्यास भारतातील प्रसिद्ध अशा नारायणा हॉस्पिटल जयपूर येथे ऍडमिट करण्यात आले त्याच दोन दिवसापासून व्हेंटिलेटर लागले होते. या ठिकाणी अमितने आठ वाजून सात मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. जे एस पी एम विद्यापीठ पुणे येथे तो बी. टेक कॉम्पुटर सायन्स प्रथम वर्षात शिकत होता त्या ठिकाणी त्याचा स्वभाव आणि अभ्यासू वृत्ती पाहून मा. कुलगुरू  यांनी त्याची जे एस पी एम विद्यापीठाच्या  समितीवर  विद्यार्थी प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती.

अमितच्या असे अकाली जाण्यामुळे सर्वांनाच अतिशय दुःख झाले असून किसान शिक्षण प्रसारक परिवार व शिवाजी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी धाराशिव चे वैद्य परिवार नवले परिवाराच्या दुःखात सहभागी आहेत. वैद्य यांचे आत्याचा अमित हा नातू होता.


 
Top