धाराशिव (प्रतिनिधी)-विकसित भारतासाठी सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा व्यक्त करण्यासाठी भाजपच्यावतीने संकल्प पत्र अभियान राबविणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी लोकसभा संयोजक नितीन काळे, जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, रामदास कोळगे, राजसिंह राजेनिंबाळकर, सुनिल काकडे, बालाजी गावडे, युवराज नळे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आमदार पाटील यांनी धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी कृष्णा खोऱ्यातील पाणी, सौर उर्जा प्रकल्प, कौशल्य शिक्षण, टेक्निकल टेक्साईल, मेडिकल आणि टेक्निकल हब, जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देणे आदीसाठी प्रयत्न करणार आल्याचे सांगितले. या संदर्भात सामान्य लोकांच्या काही सूचना, अपेक्षा असतील तर त्यांनी पण नमो ॲपला कळवावे असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले. 


धाराशिव विमानतळ सुरू

गेल्या काही वर्षापासून धाराशिव येथील विमानतळ खराब झालेल्या हवाई धावपट्टीमुळे बंद होते. सध्या या हवाई धावपट्टीचे काम झाले आहे. पूर्वीप्रमाणे पायलट प्रशिक्षण केंद्र रिलाईन्स कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात येईल. विशेष म्हणजे एअर ट्रॉपिक कंट्रोलने धाराशिव विमानतळास हवाई वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे आता टर्बो, मिनी जेट हे विमाने लॅन्ड होवू शकतात. टेक्निकल टेक्सटाईल पॉर्कसाठी अनेक उद्योगपती यांनी धाराशिव येथील एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे. उद्योगपतींना वेळ कमी असल्यामुळे व त्यांचे स्वतःचे विमान असल्यामुळे धाराशिव विमानतळामुळे औद्योगिकीकरणाला चालना मिळेल असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


 
Top